मुंबईतील अंधेरी परिसरात बुधवारी सकाळी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीने निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. डीएन नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक पानाची चिठ्ठी लिहिली होती, ज्यावरून ती डिप्रेशनमध्ये गेल्याचे स्पष्ट होते आणि त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले.
विद्या प्रमोद कुमार सिंग असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती गेल्या काही वर्षांपासून इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती, तर तिचे कुटुंबीय शेजारच्या ठाणे जिल्ह्यात राहतात, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. घटनास्थळावरून काहीही संशयास्पद सापडलेले नाही. इमारतीच्या वॉचमनने प्रथम विद्यार्थ्याचा मृतदेह जमिनीवर पाहिला आणि नंतर सोसायटीतील इतर सदस्यांना माहिती दिली, त्यांनी पोलिसांना बोलावले.