बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला
मंगळवार, 9 जून 2020 (16:45 IST)
मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय वृद्दाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला आहे. मंगळवारी ८ जून पहाटेपासून वृद्ध व्यक्ती रुग्णालयातून बेपत्ता होती. बुधवारी त्यांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर आढळला.
रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे जीव गेल्याचा आरोप वृद्धाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मालाड परसरात राहणारे ८० वर्षीय वृद्धाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सोमवारी पहाटेपासून नातेवाईक वृद्ध व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा फोन कोणीही उचलत नव्हते. काही वेळानंतर रुग्णालयातील शेजारच्या बेडवरील व्यक्तीनं वृद्धाच्या बेडवर पडलेला फोन उचलला. रुग्ण सकाळपासून बेडवर नसल्याचं सांगितलं होत.