मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी

सोमवार, 4 मे 2020 (18:07 IST)
लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपे पर्यंत म्हणजेच १७ मेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत मुंबईत संचारबंदी असणार आहे. 
 
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फक्त वैद्यकीय सेवांना म्हणजेच क्लिनिक्स, हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स यांना या वेळेतून मुभा देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. 
 
मुंबईत करोना व्हायरसचे ७ हजारच्या वर रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई शहराचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम पाळून आवश्यकता असल्यास बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती