corona virus: मुंबईत संपूर्ण नव्हे तर ‘मिनी लॉकडाऊन’ लागणार?

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (12:53 IST)
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतील लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत २० हजार १८१ रुग्ण आहेत. त्यामध्ये लक्षणे नसणारी पण बाधित आहेत असे १७ हजारपेक्षा अधिक रुग्ण आहेत. जर टक्केवारी वाढली तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आजही असं वाटत आहे की, मुंबईकरांनी घाबरण्यापेक्षा दुसरी लाट जशी रोखली तसेच राज्य सरकारने जे नियम लागू केलेत ते पाळून तिसरी लाट रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे महापौर पेडणेकर म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना परिस्थितीवर चर्चा करत आहेत. देशपातळीवर चर्चा करत आहेत.
महानगरपालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. लोक घाबरले आहेत संपूर्ण लॉकडाऊन होईल का, आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. परंतु बेफिकीरपणे काही नागरिक वागत राहिले तर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल. १०० मधील १० टक्के लोकं नियम पाळत नाही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगितल्याप्रमाणे केले तर या लाटेला थोपवू शकतो असं महापौर म्हणाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती