'ये तो खाली ट्रेलर है अभी बड़ा कुछ होने वाला है', असा या कारमधील पत्रातून इशारा देण्यात आल्या आहे. याचे गांभीर्याने दखल घेत या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या.
'जैश उल हिंद' संघटनेने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक पत्रक जारी केले असून यात संघटनेने एसयूव्ही कारमध्ये स्फोटके ठेवणारे दहशतवादी सुखरूप घरी पोहोचले असल्याचा दावा केला आहे. तसेच हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असे लिहून मुकेश अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. जैश-उल-हिंदने बिटकॉईनच्या स्वरुपात पैसा मागितला आहे. त्यांनी आव्हान दिले आहे की तुम्हाला जमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुमच्या मुलांच्या कारला SUV ची धडक बसेल अशी धमकी सुद्धा या मेसेजमध्ये देण्यात आली आहे.