सध्या मुंबईत कमाल तापमानात घट झाली असून अधून मधून काही अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान उष्ण व दमट असणार आहे. या मुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे. काही वेळेस वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमान 33 ते 35 अंश सेल्सियस राहणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या मुळे मुंबईकरांना उष्णतेला सामोरी जावे लागणार आहे.