काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी रस्त्यावरून एकटी चालत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे आक्षेपार्ह हावभाव केले.
तसेच आरोपीने पीडितेच्या मैत्रिणी असलेल्या इतर तीन मुलींचाही त्याने पाठलाग केला. भिवंडी पोलिस ठाण्याच्या अधिकारींनी सांगितले की, तक्रारीनंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले व सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.