मुंबईतल्या लोकल फेऱ्या गुरुवारपासून 100 टक्के क्षमतेने सुरू होणार
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:59 IST)
गुरुवारपासून मुंबईतल्या लोकल रेल्वेच्या फेऱ्या 100 टक्के क्षमतेने पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातले कोव्हिड निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि लोकलने प्रवास करणाऱ्यांची क्षमताही वाढलेली आहे.हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय.
या फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरच्या CSMT ते कल्याण जलद मार्गावरील 15 डबा लोकलचाही समावेश असेल. या लोकलच्या 22 फेऱ्या आता होतील