मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाज गोपाळराव शिरसाट असे मृत व्यक्तीने नाव असून १५ सप्टेंबर रोजी मलकापूर परिसरातील रेल्वे मार्गावर आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या पत्नीने शोरूम मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात शोरूम मालक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.