समीर वानखेडेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘जुजबी’ चर्चा; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले

सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (22:26 IST)
मुंबई : ड्रग्स प्रकरणाला दररोज नवीनच खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आल्याने समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. तर काही दिवसांपासून अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही वानखेडेवर आरोप करीत आहेत. नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जंयत पाटील  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, समीर वानखेडे प्रकरणावर आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुजबी चर्चा झाल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील असं देखील वळसे-पाटील सांगितलं आहे. तर, प्रभाकर साईलचं 
प्रतिज्ञापत्र मी पाहिलं आहे. त्यांना जी स्वत:च्या जीवाची भीती वाटते त्यासाठी त्यांनी संरक्षण मागितलं होतं. त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली असल्याची माहितीही वळसे-पाटील यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती