मुंबईच्या महापौर ट्विटरवर ट्रोल, एका युजरचा काढला ‘बाप’

गुरूवार, 3 जून 2021 (11:26 IST)
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीला सोशल मिडीयावर जे उत्तर दिले त्यामुळे  हा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.
 
एका ट्वीटर युजरने विचारलेल्या सध्या प्रश्नाला उत्तर देताना महापौरांनी त्याच्या बापाचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. झालं असं की, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील 1 कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला 9 कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.यानंतर एका युजरने ‘काँट्रॅक्ट कोणाला दिलं?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देण्यात आलं आहे.
 
महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला.ट्विटरवर एका युजरला महापौर किशोरी पेडणेकर यांनी जो शब्द वापरला आहे त्यावरुन त्या ट्रोल होत आहेत. ट्रोल झाल्यानंतर महापौरांनी सोशल मीडियावरुन ते ट्वीट डिलीट केलं. मात्र या ट्वीटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती