इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा रस्ता अपघातात मृत्यू, सायकल चालवत असताना कॅबने धडक दिली

गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (12:20 IST)
अवतार सैनी अपघात इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा मुंबईजवळ अपघातात मृत्यू झाला. 68 वर्षीय सैनी पहाटे काही सहकारी सायकलस्वारांसह सायकल चालवत असताना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टॅक्सीने सैनी यांच्या सायकलला धडक दिली.
 
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी नवी मुंबईतील नेरुळ येथील पाम बीच रोडवर एका कॅबने त्यांना धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की प्रख्यात चिप डिझायनर सैनी यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे 5.50 च्या सुमारास हा अपघात झाला.
 
एनआरआय कोस्टल पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी कॅब ड्रायव्हर हृषिकेश खाडे याच्याविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत रॅश आणि निष्काळजीपणे गाडी चालवणे यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सैनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सैनी यांच्या पत्नीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि मुलगी अमेरिकेत राहतात. पोलिसांनी त्यांना माहिती दिली आहे.
 
सैनी हे इंटेल इंडियाचे माजी देश प्रमुख होते, त्यांना इंटेल 386 आणि इंटेल 486 मायक्रोप्रोसेसरवर काम करण्याचे श्रेय जाते. त्यांनी पेंटियम प्रोसेसरच्या डिझाइनचे नेतृत्व केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती