लोककल्याणासाठी पुढाकार, मुंबई महापालिका लवकरच वृध्दांसाठी ‘वृद्धाश्रम’ सुरू करणार

शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:02 IST)
मुंबई महापालिकेतर्फे लवकरच वृध्दांसाठी ‘वृद्धाश्रम’ सुरू करण्यात येणार आहे. वृद्धाश्रम सुरू करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
 
ज्या आई- वडिलांनी खूप काबाडकष्ट, मेहनत करून प्रसंगी पोटाला चिमटा काढून, भाड्याच्या घरात आपल्या लहान मुलांचा सांभाळ केला, त्यांना रक्त आटवून लहानाचे मोठे केले, ऐपतीप्रमाणे शिक्षण दिले आणि पुढे कामाधंद्याला, नोकरीला लकावून आपल्या पायावर उभे केले, त्याचे लग्न लावून दिले. अशा मुलांनी व त्यांच्या पत्नीने म्हणजे सुनेने वृद्धत्व आल्यावर त्याच आई – वडिलांना, सासू सासऱ्यांना घराबाहेर काढले तर त्यांना रस्त्यावर , पदपथावर मरेपर्यंत खितपत आयुष्य काढावे लागते. अशा वृद्धांसाठी आता पालिका वृद्धाश्रम सुरू करून त्यामध्ये त्यांना आश्रय देणार आहे.
 
मुंबई महापालिका गोरेगाव ( पूर्व) येथील रहेजा रिजवूड परिसरातील जागेत १३ कोटी ३९ लाख रुपये खर्चून तळमजला अधिक नऊ मजली इमारत उभारून ८२ खाटांचा आणि सर्व सुविधांयुक्त असा वृद्धाश्रम सुरू करणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती