दिशा सालियान प्रकरणात पोस्टमार्टममध्येही हेराफेरी झाली, नारायण राणे यांचा आरोप

शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:19 IST)
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे जे सांगत आहेत, की माझा काही संबध नाही. ३२ वर्षांच्या तरुण सगळ्यांना पुरून उरला. अरे, सत्तेचा दुरुपयोग करून एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग त्यांना समजेल, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसेच दीशाची आत्महत्या नाही, तर हत्याच आहे. हे पहिल्या दिवसापासून सांगतोय. दिशाची हत्या झाली, यावर मी ठाम आहे. अडीच वर्षे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. एवढचं नाही तर आदित्य ठाकरेंना काही व्यक्तींनी घटनास्थळी पाहिल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला.
 
दिशा सालियान प्रकरणात पोस्टमार्टम मध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. आता काही उद्धव ठाकरे यांची सत्ता नाहीये तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. पुढच्या वेळी तर चित्र आणखी वेगळे असणार आहे, असंही नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी अनेक भ्रष्टाचारही पचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता सगळे बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीत झोप उडालेली आहे, असं नारायण राणे म्हणाले.
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती