धारावीत बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम मुस्लिम समुदायाने पाडले

सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (15:09 IST)
धारावीत मेहबूब ए सुबनिया मशीदीचे बेकायदेशीर बांधकाम स्वतः मशिदी ट्रस्टने पाडले. गेल्या आठवड्यात महापालिकेचे पथक अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले असता लोकांनी विरोध करायला सुरु केले. या वेळी परिसरात तणावाची स्थिती झाली. प्रकरण वाढत असलेले पाहून ट्रस्टने बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिले. आज सोमवारी  मशिदीला पाडण्यात आले. 

मुंबईतील धारावीची 90 फूट रोडवरील 25 वर्ष जुनी सुभनीया मशीदचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक आले असताना जमावाने गोंधळ घातला.लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत  होते. कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला. यावेळी बीएमसीच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि आज मशीद पाडण्यात आली. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती