मुंबईत दहशतवादी हल्याचा धोका असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. इंटेलिजन्स ब्युरो ने शहरात संभाव्य दहशतवादी कारवायांचा इशारा देण्यात आला असून मुंबई पोलीस अलर्टमोड वर आली असून धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व पोलीस उपयुक्त आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षेवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे.
एका अहवालानुसार, शहराच्या डीसीपी (पोलीस उपायुक्त) यांनाही त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. शुक्रवारी पोलिसांनी गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात सुरक्षा कवायत केली. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत चौकशी केली असता, अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी सण आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता हे बंदोबस्त करत आहे.
चेंबूरमध्ये, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली, तर माटुंगा येथे, सकाळच्या पोलिस तपासणीनंतर एक मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले.गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांचा अतिरिक्त पथक तैनात करण्यात आला आहे.पोलीस बारीक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मुंबईचे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त केला आहे. भक्तांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहे.