पुढील ७ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना स्वत: खर्च करूनच कोरोना चाचणी करायची आहे. तसेच त्याचा अहवाल
[email protected] या ई-मेल आयडीवर पाठवायचा आहे. केडीएमसीच्या सर्व प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमध्ये भेट देऊन याबाबत खातरजमा करण्यासही सांगण्यात आले आहे. जे या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा इशाराही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.