राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग

बुधवार, 22 जून 2022 (11:26 IST)
महाराष्ट्रात एक राजकीय संकट उभं राहिलं असताना एक नवी बातमी समोर येत आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोश्यारी यांना एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही अशी माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली आहे.
 
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
 
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
"आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही", असं एकनाथ शिंदे यांनी सुरत विमानतळावर सांगितलं होतं.
 
"मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेनचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही", असं शिंदे यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती