मुंबईत मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू

सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:38 IST)
मुंबईत पालिकेतर्फे २ नोव्हेंबरपासून २४४ ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे करोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होईल.
 
पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये अशा एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
 
या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे. http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावरदेखील यादी उपलब्ध असेल. सुरुवातीस रोज सकाळी १० ते १२ या कालावधीत ही चाचणी सुविधा केंद्रावर ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती