हात झटकून केंद्राला बोट दाखवणं बंद करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत करा : फडणीस

गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (08:08 IST)
मुख्यमंत्री चूकीची माहिती सांगत आहेत, मुख्यमंत्र्यांकडे वस्तूस्थिती पोहोचली नाही. आम्ही गेलेल्या ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची तक्रार आहे. ८० ते ९० टक्के पंचनामे झाले हे सांगणे योग्य नाही. राज्य सरकार आपले हात झटकून केंद्राला बोट दाखवणं बंद करा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाणी करत असून त्यांनी पत्रकार परिषद बोलत होते. 
 
तीन दिवसांमध्ये ९ जिल्ह्यांमध्ये प्रवास केला. एकूण परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, कांदा यासह जवळजवळ सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. जमीन खरवडून गेली आहे. माती वाहून आणून शेतकऱ्यांना जमीन तयार करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. ३ दिवसात ९ जिल्ह्यात ८५० किमी प्रवास केला. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. पुढच्या पिकाकरिता जमीन तयार करायची हे मोठे आव्हान आहे. महाबीजचं बियाणं बोगस निघालं. तिबार पेरणी केल्यांनंतरही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार नाही, कृषीपंप वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती