पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने अत्याचार केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी काकाला बेड्या ठोकल्या आहेत.