माहितीच्या आधारे मीरा भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने छापा टाकला. आणि महिलांना अटक करण्यात आली.महिला दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये राहत होत्या तपासादरम्यान या महिलांकडे भारतात राहण्यासाठी वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. या महिला कामाच्या शोधात येथे आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
या महिलांवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेमुळे परिसरातील सुरक्षा परिस्थिती आणि अवैध स्थलांतरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई केली जाईल, जेणेकरून कायद्याची खात्री करता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे पोलीस प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे.