बाईक अपघातात बळी पडलेल्या २८ वर्षीय ब्रेन डेड तरुणाने केले हातदान
भारतामध्ये मुंबईतील हा पहिलाच प्रसंग आहे ज्यात अर्धा हात प्रत्यारोपित झाला आहे.
रुग्णाचे वर्णन: एप्रिल २०२१ मध्ये टायर फॅक्टरीत कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणाचे दोन्ही हात यंत्रात अडकले होते. रबराचे गरम द्रव अंगावर पडल्याने त्याचा हात आणि मांड्याही भाजल्या होत्या. त्याचा अर्धा डावा हात पूर्णपणे निकामी झाला होता. अपघातादरम्यान त्याने उजव्या हाताची तीन बोटे (तर्जनी, मधली आणि अनामिका) गमावली. त्याच्यावर भांडुप येथील स्थानिक रुग्णालयात 3 आठवडे उपचार सुरू होते. २ महिन्यांपूर्वी हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केल्यानंतर तो हॅन्ड ट्रान्सप्लांटची वाट पाहत होता.
निदान: रुग्णाचा डावा हात कापण्यात आला व उजव्या हाताला दुखापत असल्याने अपंगत्व आले होते. त्यामुळे त्याच्यावर हात प्रत्यारोपण करणे मोठे आव्हानात्मक होते. डाव्या बाजूच्या हाताला गंभीर जखमेमुळे अपंगत्व असल्याने उजव्या हाताचे मधले बोट आणि अनामिक वापरून आंशिक प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र अंगठा आणि करंगळी राखून ठेवण्यात आली.