मुंबईत थुंकणाऱ्यांकडून एका दिवसात 1 लाख 11 हजाराचा दंड वसूल

गुरूवार, 19 मार्च 2020 (11:39 IST)
मुंबईत एकाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 111 जणांवर कारवाई करण्यात आली. या लोकांकडून एकाच दिवसात 1 लाख 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
 
करोना विषाणूचा संसर्ग पसरत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केलं असताना मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात 1 हजार रुपये दंड आकारण्याची घोषणा केली होती. कालच ही घोषणा केली गेली असून तत्काळ प्रभावाने त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. 
 
यासाठी पालिकेने शहरभर मार्शल्स तैनात केले असून एकाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांकडून दंडापोटी 1 लाख 11 हजार रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली. 
 
सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत होता. तो आता 1000 रुपये करण्यात आला आहे. बुधवारपासूनच यावर अंमलबजावणीही सुरु झाली आणि संध्याकाळपर्यंत थुंकणाऱ्या 111 लोकांवर कारवाई केली गेली असून दंडा आकाराण्‍यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती