मिळालेल्या माहितीनुसार खारघर पोलिसांनी त्याच्या ११ वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल ५० वर्षीय पुरूषाला अटक केली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती, परंतु पीडितेच्या आईने गुरुवारी तक्रार दाखल केली. तेव्हापासून आरोपी फरार होता आणि शनिवारी पोलिसांनी त्याला तुर्भे परिसरातील एका लॉजमधून अटक केली.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेची आई घटस्फोटित महिला आहे आणि तिने सुमारे सहा महिन्यांपूर्वी आरोपीशी दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर, आरोपी पीडिता आणि तिच्या आईसोबत खारघरमधील घरात राहू लागला. १२ ऑगस्ट रोजी पीडितेची आई घरी नसताना आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.