दृष्टिहीन संगीतकारांनी कंपोज केले मंत्रमुग्ध करणारे गाणे

गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (10:13 IST)
मुंबई, फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिकच्या आणि स्पायकरच्या सहकार्याने दोन दृष्टिहीन संगीतकार आणि बॉलिवूडचे नामांकित संगीतकार राघव सच्चर यांना एकत्र आणून एक मंत्रमुक्त करणारे संगीत तयार केले आहे. व्हिडिओमध्ये राघव सच्चर सोबत दृष्टिहीन विद्यार्थी वीर मुलराज आणि सचिन पाटील म्युझिक व्हिडिओमध्ये आकर्षक ट्यूनवर एकत्र काम करताना दिसत आहेत. स्टुडिओमध्ये एकत्र आलेल्या कलाकारांची निरागस भावनांना एफएसएमला प्रिय असलेल्या संगीताची आवड तसेच स्पायकरच्या तरूण आणि उत्साही भावनेला मूर्त रूप दिले आहे.

“वर्षानुवर्षे संगीत ही माझी आवड राहिली आहे आणि दृष्टिहिन, तरूण आणि उत्साही संगीतकार, वीर आणि सचिन यांच्याशी काम करण्याचा अनुभव छान होता. त्यांचे ज्ञान, समजूतदारपणा आणि संगीतावरील प्रेमामुळे प्रेरित केले आणि स्पायकर यांनी या भन्नाट संकल्पनेत उत्तम सहयोग दिले आहे. ”असे राघव सच्चर म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती