सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची मोठी कारवाई

मंगळवार, 9 मे 2023 (07:51 IST)
पनामा पेपर प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. फेमा (FEMA) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
 
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सक्तवसुली संचालनालयाने (ED) पनामा पेपर्स प्रकरणात संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी झेड. एस. पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तपास केला.
 
ईडीने फेमा कायद्यातील तरतुदींनुसार, पूनावाला यांची मुंबईच्या वरळी येथील सीजे हाऊसमधून ४१.६४ कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या. या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून केला जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती