मुंबई महापालिका कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी संस्थांमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करते. मात्र निर्बीजीकरण प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. सदर खासगी संस्थांनी, सन २०१८ मध्ये ८५,४३८ कुत्र्यांचे , सन २०१९ मध्ये ७४,२७९ कुत्र्यांचे , २०२० मध्ये ५३,०१५ कुत्र्यांचे, २०२१ मध्ये ६१, ३३२ कुत्र्यांचे आणि ऑगस्ट २०२२ पर्यंत ५०, ६२२ कुत्र्यांचे असे मागील पाच वर्षात एकूण ३,२४,६८६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.