मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या तपासणीत एका महिलेकडून 60 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ही महिला झिम्बाब्वेची रहिवासी आहे . मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला 12 फेब्रुवारीला झिम्बाब्वेहून मुंबई विमानतळावर आली होती. तिची झडती घेतल्यावर तिच्या कडून 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.