पोलिसांनी सांगितले की, 35 वर्षीय सबिस्ता अन्सारी हिच्यावर अॅसिड हल्ल्याचा आरोप आहे. ही महिला नेहमी काही मांजरींना खायला घालायची . हा भटका कुत्रा मांजरांचा पाठलाग करायचा हे या महिलेला आवडत नसे. म्हणून या महिलेने कुत्र्यावर अॅसिड फेकले. जेणे करून तो मांजरीच्या मागे जाऊ नये.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
फुटेज मध्ये दिसत आहे की , ही महिला झोपलेल्या कुत्र्याजवळ जाते आणि त्याच्यावर अॅसिड फेकते. घाबरून हा कुत्रा सैरभर होऊन पळत आहे. आणि वेदनेने विव्हळत आहे. या कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या तुकाराम ने त्याला रडताना आणि घायाळ असलेले पाहून तातडीनं त्याला पशु चिकित्सालयात नेले.
या घटनेची माहिती मिळताच टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य आणि तिची टीम कुत्र्याला (ब्राउनी) वाचवण्यासाठी पुढे आली. ब्राउनीला जया भट्टाचार्य यांच्या 'थँक यू अर्थ' या एनजीओमध्ये नेण्यात आले, जे गरजू प्राण्यांना वाचवते आणि त्यांच्यावर उपचार करते.