धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

शनिवार, 26 डिसेंबर 2020 (08:40 IST)
कोरोनाचा प्रसार रोखण्यात जागतिक रोल मॉडेल ठरलेल्या धारावीने आणखी एक पराक्रम करून दाखविला आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्यात येथे पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता. तर तब्बल नऊ महिन्यानंतर शुक्रवारी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. सध्या या ठिकाणी केवळ १२ सक्रिय रुग्ण आहेत. 
 
धारावीमध्ये दाटीवाटीने वसलेली साडेआठ लाख एवढी लोकसंख्या येथे आहे. अशा धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखणे पालिकेसाठी मोठे आव्हान होते. मात्र  याच धारावी पॅटर्नचे जगात कौतुक केले जात आहे. प्रतिबंधक उपाय, सर्व खबरदारीबरोबरच समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हेच धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. तर धारावीत यशस्वी ठरलेली 'चेस द व्हायरस' ही मोहीम फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती