कोव्हिड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.त्यासाठी ऑनलाईन अॅप द्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे.अॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल.
15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास मिळविण्यासाठी सामान्य नागरिकांना जवळच्या रेल्वे स्थानकात त्यांनी लसीचे 2 डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, सोबत आधारकार्ड, ओळखपत्र सादर केल्यास तेथील पालिका कर्मचारी त्यांना प्राप्त लिंकच्या आधारे फक्त 3 सेकंदात त्याची सत्यता पडताळून रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास व प्रमाणपत्र देतील. त्या आधारेच त्यांना प्रवास करता येणार आहे
सामान्य नागरिकांना अगदी लसीचा1डोस घेतला असेल तरी कोणत्याही परिस्थितीत रेल्वेची तिकिटे देण्यात येणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी , नागरिक यांनाच पूर्वीप्रमाणे रेल्वे तिकीट देण्यात येणार आहेत,
तसेच, मुंबईतील 53 रेल्वे स्थानकात 358 खिडक्यांवर व मुंबई बाहेरील एमएमआर रिजनमधील 50 रेल्वे स्थानकतील खिडक्यांवर तेथील पालिका कर्मचारी लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे मासिक पास देतील. यासंदर्भातील प्रक्रिया सकाळी 7 पासून ते रात्री 11 पर्यन्त दोन सत्रांत करण्यात येणार आहे.जेणे करून गर्दी होऊ नये.तसेच ऑफलाईन प्रक्रियेसाठी कोणतीही अडचण होऊ नये याची काळजी देखील घेतली जाणार असे पालिकेने म्हटले आहे.