देशात कोरोना वेगाने पसरत आहे; मायानगरी मध्ये चिंता वाढली, या लोकांनी काळजी घ्या

सोमवार, 16 जून 2025 (14:12 IST)
देशात कोरोना वेगाने पसरत असून महाराष्ट्रातील मुंबईत कोविड संसर्गाचे रुग्ण वाढत आहे, विशेषतः कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे. डॉक्टरांनी इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. 
 
तसेच पावसाळ्यातील आजारांसोबतच, यावेळी मुंबईकरांना कोविड संसर्ग टाळण्याची गरज आहे. जूनमध्ये आतापर्यंत दररोज सरासरी २७ जणांना कोविडची लागण झाली आहे. तर मे महिन्यात दररोज सरासरी १४ जणांना संसर्ग झाला होता. मुंबईतील डॉक्टरांनी लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः जे इतर आजारांनी ग्रस्त आहे आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे.
 
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत २२ नवीन कोविड रुग्ण आढळले. यावर्षी मे महिन्यातच कोविड संसर्गाने वेग घेतला.मे महिन्यात ४३५ जणांना कोविडची लागण झाल्याचे आढळून आले आणि जूनच्या पहिल्या १५ दिवसांत ४१० जणांना कोविडची लागण झाली आहे. म्हणजेच या वर्षी जानेवारीपासून एकूण ८५१ जणांना कोविडची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
ALSO READ: माथेरानच्या शार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 पर्यटक बुडाले
तसेच रविवारी महाराष्ट्रात ४० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. यासह, या वर्षी राज्यात २१४५६ लोकांची चाचणी केल्यानंतर, एकूण २००७ लोकांना कोविड संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चांगली गोष्ट म्हणजे एकूण बाधितांपैकी १४३९ लोक बरे झाले आहे. सध्या राज्यात ५४० सक्रिय रुग्ण आहे.
ALSO READ: बुलढाणा : देवी दर्शनासाठी गेलेल्या आई आणि मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती