राज्यात कोरोना विषाणूचे चार संशयीत रुग्ण

मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:25 IST)
चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्गानंतर देशात आणि राज्यात सतर्कता वाढविण्यात आली आहे. चीनच्या सीमा अरुणाचल व भूतानकडून भारताला जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे भारतात चीन व नेपाळसह वरील सर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. काही जण चीनहून अन्य देशांच्या मार्गे परतत असल्याने त्यांच्यावरही देखरेख ठेवण्यात येत आहे.नेपाळमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. 
 
मुंबईत सोमवारी एक तर पुण्यात दोन संशयीत रुग्ण आढळले. याखेरीज आधीच्या संशयीत रुग्णाला पुन्हा देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आधीच्या तीन संशशियांपैकी कोणालाही लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र केरळमध्ये एक व राजस्थानमध्ये दोन संशयीत आढळले असल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती