धारावी नाही तर अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या

गुरूवार, 25 मार्च 2021 (16:03 IST)
मुंबईत गेल्या वर्षी करोनाचा हॉटस्पोट ठरलेल्या धारावीत तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरतो आहे.
 
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यातही अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
 
अंधेरी पश्चिम या भागात करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. येथे दिवसाला तब्बल 200 ते 300 रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम भाग हा करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. अंधेरी पश्चिमभागातील वाढती रुग्णसंख्या पाहता बीएमसी लवकरच जुहू बीच बंद करण्याच्या विचारात आहेत. जुहू बीचवर पालिकेचे क्लिनअप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय, मास्कशिवाय वावरणाऱ्यांकडून दंड आकारला जात आहे. त्यासोबतच अँटिजेन टेस्टची संख्याही वाढवण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती