मुंबईत पुन्हा कोरोनाचा स्फोट, आजही 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले; 6 मृत्यूची नोंद

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (22:50 IST)
देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर मुंबईवर तीव्र झाला आहे. मायानगरी मुंबईत शुक्रवारी 20971 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजारांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी गुरुवारी शहरात 20 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आले होते.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महाराष्ट्रातील आकडा खूप वाढला आहे. शुक्रवारी शहरात 20971 नवीन रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या लाटेचे परिणाम अजून यायचे आहे आणि त्याआधी ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सध्याची कोरोना प्रकरणे डेल्टा व्हेरियंट मुळे दुसऱ्या लाटेच्या शिखरावर आढळलेल्या 11,206 प्रकरणांपेक्षा 75 टक्के जास्त आहेत. इतकेच नाही तर मुंबईचा दैनंदिन सकारात्मकता दरही झपाट्याने 30 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एकूणच, मुंबईत ज्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे त्यापैकी प्रत्येक तिसरा व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, शहरातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण 91731 झाले आहेत. तर शुक्रवारी 8,490 रुग्ण बरे झाले. 
महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारी कोरोनाची आकडेवारी भयावह आहे, पण दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अजूनही कमी आहे. यामुळेच सरकार जास्त निर्बंध लादण्याचा विचार करत नाहीये. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 'लोकल गाड्या थांबवण्याचा सध्या कोणताही विचार सुरू नाही. याशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यावर कोणतेही निर्बंध घालण्याचा विचार नाही. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती