आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवर सीएम शिंदे यांची प्रतिक्रिया म्हणाले-

मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (16:42 IST)
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीं अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला. या एन्काउंटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य समोर आले आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे समोर आले आहे. 
 
 मुख्यमंत्री म्हणाले या प्रकरणाचा तपास केला जाईल. लहान चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला. यावरून विरोधक आरोपीला  फाशी देण्याची मागणी करत होते. आता विरोधक त्याची बाजू घेत आहे. खरचं हे दुर्देवी आहे. या गोळीबारात एक पोलीस जखमी झाला आहे. या कडे विरोधकांचं लक्ष नाही.

जे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था जपण्यासाठी भर थंडी, पावसात, उन्हाळ्यात जनतेच्या पाठीशी ठाम पणे उभे असतात त्याच पोलिसावर गोळीबार केला जातो. त्यांच्यावर विरोधकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.  
 
बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. सोमवारी अक्षय शिंदेला ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी चौकशीला घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावली आणि गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.  
 
या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विरोधक हे फेक एन्काउंटर असल्याचे म्हणत आहे.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती