सिडकोची सदनिका तसेच व्यावसायिक गाळे, भूखंडची मेगा लॉटरी आहे. सिडकोने ऑनलाईन जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तर ग्राहकांना आजपासून अर्ज करता येणार आहे. एकूण 4 हजार 158 घरांसाठी, 245 दुकाने आणि 6 व्यावसायिक भूखंडाची ही लॉटरी असणार आहे.
नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोड इथे ही घरं आहेत. परवडणाऱ्या दरात या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि उर्वरित 3 हजार 754 घरं ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.