लालबागच्या बाप्पाच्या दरबारात धक्काबुक्की

बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (13:31 IST)
तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय आज गणरायाचे आगमन ढोल ताश्यांचा गजरात मोठ्या जल्लोषात होत आहे. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमनाच्या तयारीत सज्ज आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी लागली आहे. मुंबईत गणेशोत्सवाच्या प्रथम दिवशी लालबागच्या मुखदर्शनाच्या रांगेतून जात असताना महिला भाविक आणि लेडी मार्शल मध्ये बाचाबाची होऊन धक्काबुकी करत हाणामारी होऊन गोंधळ झाला. 
 
लालबागच्या राजाच दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात 10 दिवस 24 तास भाविकांची गर्दी असते. गर्दीत लालबाग चे दर्शन करायचे आणि पुढे वाढायचे तेथे उपस्थित असलेले सुरक्षाकर्मी कोणाला ही जास्तवेळ थांबू देत नाही. मुंबईच्या लालबागचे दर्शन घेताना एका महिला भाविकाला महिला सुरक्षाकर्मीने पुढं ढकललं त्यामुळे महिला भाविक आणि महिला सुरक्षा कर्मीची बाचाबाची झाली नंतर वाद विकोपाला गेले आणि त्यांच्या हाणामारी झाली.या ठिकाणी गोंधळीच आणि तणावाचे वातावरण झाले. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत वाद मिटवला.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती