परमबीर सिंग खंडणी प्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई, दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (10:19 IST)
मुंबईचे माजी आयुक्त परम बीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणी राज्य सीआयडीच्या पथकाने महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सायंकाळी दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दोघांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणी राज्य सीआयडीच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. तपास पथकाने महाराष्ट्र पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळ आणि आशा कोरके या दोघा पोलीस अधिकाऱ्यांना वसुली प्रकरणातील सहभागाबद्दल चौकशीसाठी बोलावले होते. 
 
अनेक तास चाललेल्या चौकशीनंतर सायंकाळी उशिरा दोघांना अटक करण्यात आली. तपास पथकातील एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, चौकशीदरम्यान दोघेही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणात काही महत्त्वाची माहिती मिळावी यासाठी तपास पथक दोघां कडून कसून चौकशी घेत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती