विना मास्क फिरणाऱ्या भाजप आमदाराला मंत्रालय परिसरात दंड

बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:22 IST)
मुंबई : राज्यावर कोरोनाचे नवे संकट ओमायक्रॉनचे संकट घोंघावत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केले आहे. पण, लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडला आहे. मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क फिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
 
मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई केली आहे. मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत. मंत्रालयातून बाहेर पडताना मास्क नसल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी २०० रुपयांचा दंड ठोकला आहे. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचं मंत्रालयात कौतुक होतं आहे. आपल्यावर कारवाई करण्यात आली, याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असता असं सांगून दंड भरला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती