बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या 12 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. मुंबईत ते 5 एप्रिल ते 11 एप्रिल या कालावधीत श्रीमद भागवत कथेचे पठण करतील .पहिल्या दिवसाच्या श्रीमद भागवत कथेनंतर विश्रांती घेताना त्यांनी कथेच्या परिसरातील इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामात बांधलेल्या निवासस्थानी काही काळ राहिल्यानन्तर सेवादारांसह आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांसोबत क्रिकेटचा सामना खेळला.