ठाण्यात रिक्षाचालका कडून विद्यार्थिनीचा विनयभंग

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (23:54 IST)
राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उदभवला असून राज्यात महिलांच्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील ठाण्यात महिलेच्या सुरक्षेच्या प्रश्न उदभवला आहे. ठाणेच्या स्टेशन परिसरातून एका विद्यार्थिनींची रिक्षाचालकाने छेड काढून तिला फरफटत नेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली असून या घटनेत मुलगी जखमी झाली आहे.  घटनेनंतर आरोपी रिक्षाचालक फरार झाला असून त्याचा अजून शोध लागलेला नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकाने एका विद्यार्थिनींची छेड काढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यावर तिने रिक्षाचालकाची कॉलर धरून त्याला जाब विचारला नंतर रिक्षा चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला अशामध्ये पीडित मुलगी फरफट ओढली गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मुलगी जखमी झाली आहे. 
महिलांच्या सुरक्षे बाबत प्रश्न निर्माण झाले असून राज्य सरकारने यावर योग्य पाऊले उचलून 
महिलांचा सुरक्षेसाठी काही निर्णय घेण्यात यावे अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा   रुपाली चाकणकर यांनी  केली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या बाबत कडक कारवाई  करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहे.   

गर्दीच्या ठिकाणी आणि कॉलेज परिसरात पोलिसांचं गस्त वाढवूंन महिलांचा सुरक्षेला प्राधान्य देणं हे महत्त्वाचं असल्याचं  ते म्हणाले. घटनेची माहिती मिळतातच मुलीच्या पालकांनी  आणि नगरसेवक संजय वाघुले यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर आरोपी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. अद्याप आरोपी रिक्षा चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती