अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अल्पवयीन ट्रक चालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार कायद्याचा संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.या अपघातात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांनी टोईंग मशीनच्या साहाय्याने खराब झालेले ट्रक आणि ऑटोरिक्षा हटवून वाहतूक सुरळीत केली.