तसेच 18 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली असून मंगळवारी सायंकाळी 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. हार्बर परिसरात घडलेल्या या घटनेची नौदलाने चौकशी सुरू केली आहे. अधिका-याने सांगितले की शोध आणि बचाव मोहिमेचा भाग म्हणून, बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी तटरक्षक दलासह नौदलाचे हेलिकॉप्टर आणि बोटी देखील तैनात करण्यात आल्या आहे.