मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत 5 कामगारांचा मृत्यू

रविवार, 9 मार्च 2025 (15:30 IST)
मुंबईत रविवारी मोठा अपघात झाला.. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीची सफाई करणाऱ्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. 
ALSO READ: मुंबईत मेडिकलच्या विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळले, तिघांवर गुन्हा दाखल
सदर घटना मुंबईतील नागपाडा भागात रविवारी घडली.बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांचा टाकीची सफाई करताना जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. हे कामगार पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी टाकीत गेले होते. मात्र बराच वेळ झाल्यावर ते बाहेर आले नाही. आजूबाजूच्या लोकांनी टाकीत डोकावून पाहता त्यांना त्यांचे मृतदेह दिसले. 
ALSO READ: मुंबईत कार-स्कूटरच्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू;
आजू-बाजूच्या लोकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: मुंबईतील हॉटेलच्या खोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, बायको आणि मावशीला दोषी ठरवले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती