कॉंग्रेसच्या नियोजन समितीवर महाराष्ट्रातून 4 जणांचा समावेश

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:16 IST)
नवी मुंबईराष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर सुरू असून या शिबिरात कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी खल झाला. पक्षाची भावी वाटचाल ठरवण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी विविध अशा 6 विषयांवर समित्या स्थापन स्थापन करण्याचा निर्णय झाला.
 
या नियोजन समितीवर महाराष्ट्रातून 4 जणांचा समावेश झाला आहे. त्यामध्ये अशोक चव्हाण राजकीय समितीचे सदस्य, मुकुल वासनिक हे संघटना समितीचे अध्यक्ष, तर प्रणिती शिंदे अर्थशास्त्र समितीवर तर नाना पटोले शेती समितीवर सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. चिंतन शिबिरातील या समित्या पक्षाच्या भावी राजकिय नियोजनाची दिशा ठरवणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती