बाबरी पाडत होतो तेव्हा तुम्ही बिळात बसलेलात'; मुख्यमंत्र्यांची भाजपावर जळजळीत टीका

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:15 IST)
मुंबईकरांना आता बस, लोकल आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

बेस्टच्या मोबिलिटी कार्डच्या लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बेस्टच्या पुढे चला असे घोषवाक्य बोलता बोलता मुख्यमंत्र्यांनी पुढे-पुढे करत विरोधकांचा चौफेर समाचार घेतला.

हिंदुत्वाच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी डरकाळी दिली आहे. मला देवळात बडवणारा हिंदु नकोय, अतिरेक्यांना धडकी भरवणारा हिंदु हवाय, असे म्हणत आम्हाला घंटाधारी हिंदुत्व नको, गदाधारी हिंदुत्व हव आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढला.
 
राणा दाम्पत्यानी मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भीम रूपी महारूद्रा अगांवर आल्यावर दाखवणार असाच इशारा दिला. तसेच दादागिरी करून याल तर मोडून काढू. दादागिरी कशी मोडायची आहे हे बाळासाहेबांनी शिकवलय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती