Murder Case News : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोळीबार करणाऱ्याला शस्त्रे पुरवल्याप्रकरणी नवी मुंबईतील एका भंगार व्यापाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 10 झाली आहे. गुरमेल बलजीत सिंग (23) आणि धर्मराज राजेश कश्यप (19) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित शूटरची नावे आहेत. खुनाच्या कटात सहभागी असलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि अन्य दोन जण फरार आहेत.
२६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी : भागवत सिंग ओम सिंग (32) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उदयपूर, राजस्थानचा असून सध्या तो नवी मुंबई येथे राहत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, सिंग यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.