दहशतवाद्यांनी राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याचा ई-मेल पोलिसांना पाठविल्यामुळे आज त्यांची चांगलीच धावपळ उडाली. हा ईमेल मिळाल्यानंतर तत्काळ विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.
गुजरातहून हा ईमेल आल्याचे विमानतळ अधिकार्यांनी सांगितले. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ही सुरक्षा अधिकच कडक करण्यात आली असून विमानतळापासून पाचशे मीटरच्या परिसरात पार्किंग व जमावबंदीस मनाई करण्यात आली आहे.